झटपट होणारा - किल्ले तिकोना
लोहगड विसापूर वरून पवनेच्या काठावर समोरासमोर २ किल्ले दिसतात. दोन्ही किल्ल्यांचा आकार साधारण त्रिकोणी. त्यातला एक किल्ले तुंग तर दूसरा किल्ले तिकोना.
ह्या शनिवारी तिकोन्याला जायचे ठरवले. ऑफिसच्या ७-८ मित्रांचा एक गृप करून २ गाड्यातून आम्ही सकाळी ५.३०-५.४५ पर्यंत चांदणी चौकातून पौडच्या दिशेने निघालो.
चांदणी चौक - मुळशी पौड रोड मार्गे आम्ही साधारण तासाभरात तिकोन्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकोनापेठ गावात पोहोचलो. वाटेत कुठल्याही चांगल्या प्रवासाचे प्रतिक असलेला वाट चुकण्याचा विधी पार पाडला.
मुळा नदीच्या पुलावरून दिसलेला सूर्योदय |
तिकोना पेठेच्या अलिकडे २ रस्ते फुटतात उजवीकडे रस्ता तिकोना पेठेमार्गे पुढे लोणावळ्याला जातो तर दूसरा डावीकडे पवनेच्या दिशेने जातो. |
वाटेत एका छोट्या टपरीत सोबत आणलेली इडली चटणी, चहा, क्रिमरोल असा नाश्ता करून ८ पर्यंत आम्ही गडाच्या पायथ्याशी गाड्या लावून गड चढायला सुरुवात केली.
तिकोना पेठेच्या बाहेरच एक ही कमान आहे. |
त्रिकोणी आकार असल्याने गडाला 'तिकोना' हे नाव आहे. |
बाकी गड खुप सोपा आहे. बालेकिल्ल्यापर्यंत जायला पायऱ्या आणि सरळ चढण असा मार्ग आहे.
गडावर जाताना वाटेत एका दरवाज्यापाशी छोटी गुहा आहे. |
पुढे एका जागी दगडात कोरलेली मारुतीची मूर्ती आहे. |
ज़रा पुढे गेल्यावर तळजाई देवीचे मंदीर आणि त्याच्या समोरच एक छोटी विहीर आहे. पाणी पिण्यायोग्य आहे. |
मंदिराच्या आसपास काही स्वयंसेवकांनी वृक्षारोपण केले आहे.
बसायला दगडी कठडे केलेले आहेत. |
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने ठिकठिकाणी गडाबद्दलची माहिती देणारे फलक लावलेले आहेत. |
खालून दिसणारी बालेकिल्ल्याची तटबंदी |
तत्कालीन सिमेंट बनविण्यासाठी चुना दळन्याकरिता वापरण्यात येणारे जाते. |
शेवटी बालेकिल्ल्यापाशी मात्र अरुंद आणि शिडीसारख्या सरळसोट वर जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत. तिथून थोड़ी काळजी घेऊन चढावे व उतरावे लागते. विशेषत: पावसाळ्यात वाट निसरडी असल्याने खबरदारी घ्यावी.
वाटेत एक दोन गुहा आहेत जिथे पाणी उपलब्ध असते.
बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोर वितंडेश्वराचे मंदिर आहे. तिकोन्याला 'वितंडगड' असेही नाव आहे.
वितंडेश्वराचे मंदिर |
मंदिराजवळच एका तटबंदीपाशी गेल्यावर समोर दिसणारा किल्ले तुंग
किल्ले तुंग |
एकमेकांचे आणि आजुबाजुचे फोटो काढत ९.३० पर्यंत आरामात वर पोहोचलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही निघालो. साधारण २५ मिनिटात पायथ्याशी पोहोचलो.
Selfie time |
पावसाळ्यात पुन्हा एकदा भेट द्यायचे ठरवून आम्ही तिकोन्याचा निरोप घेतला. परत येता येता वाटेत हडशीला जाऊन साधारण १२.३० पर्यंत घरी पोहोचलो.
हडशी मंदिर |
************************************************************************************
कसे जावे
पुण्याहून २ प्रमुख मार्गांनी तिकोना करता येतो.
१. चांदणी चौकामार्गे - मुळशी-पौड रोडने (पौड बस स्थानकापाशी उजवीकडे वळावे) - हडशी मार्गे - तिकोना पेठ
२. जुन्या पुणे मुंबई महामार्गाने - कामशेत गावातून - तिकोना पेठ
पुण्याहून साधारण ३-४ तासात तिकोन्याला जाऊन येता येते. एकाच दिवसात तुंग आणि तिकोना सहज करता येतात.
तिकोना पेठेत खाण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच किल्ल्याची देखरेख करणारे श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे एक कार्यकर्ते, सुजित मोहळ (मो.९५४५८६३८२४) हे पेठेतच राहतात त्यांच्याकडे पण जेवणाची व्यवस्था होऊ शकते.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे - ९८२२६७०५५८ / ९८५०५२००५८ / ९८८१८३३००२
***********************************************************************************
एकूण खर्च
पेट्रोल - २ गाड्या एकूण अंतर १०० किमीसाठी १२ लिटर, (८०.५/- प्रमाणे)
८ लोकांसाठी रू. १०००
नाश्ता - चहा - रू.५ क्रिमरोल - रू. ४
/*********************************************************************/
May your search through nature lead you to yourself.
Enjoy Travelling!!
Thank you
Comments
Post a Comment