साद देती सह्यकडे.

"उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. आता उकाडा हळू हळू कमी होत जाणार. मग थोड्याच दिवसात काळे सावळे ढग आभाळात दाटून येणार अन् कोसळणाऱ्या जलधारांनी अवघि धरणी न्हाऊन निघणार. त्यावेळी या माझ्या सहवासात आणि अनुभवा माझे सौंदर्य. पर्वतराजीने नसलेला हा हिरवा शालू अन् त्यावर एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे भासणारे, ते कातळकड्यातून प्रचंड वेगाने वाहणारे जलप्रवाह. गर्द धुक्यात गुरफटलेला तो बालेकिल्ला, ती हरवलेली पायवाट, मधेच वाट अडवणारे ते खट्याळ निर्झर, चहुबाजूनी ऐकू येणारा पक्षांच्या किलबिलाट..अनुभवा माझ्या सहवासात सोसाट्याचा वारा आणि बरसणाऱ्या जलधरांनी केलेले तांडव.. माझ्या सहवासात दुर्गभ्रमंति करताना पहा हे अभेद्य किल्ले, हे अधळ बुरुज, हे भयावह कडेलोट 
आणि जाणून घ्या त्यांचा इतिहास. सतत भविष्याची चिंता करत वर्तमान जगत असताना, इतिहासाचा हा क्षणिक सहवास नक्कीच सुखद भासेल.

स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या एका द्रष्टयाच्या सहवासाने पावन झालेले हे सह्यदुर्ग!!
इतिहास घडविणाऱ्यांची हीच तर खरी स्मारके!!"

 

Comments